संयुक्त बँक खाते आणि खातेदारांचे हक्क : ऍड. रोहित एरंडे. ©
संयुक्त बँक खाते आणि खातेदारांचे हक्क ऍड. रोहित एरंडे. © कायद्याचा अभ्यास हा निरंतर चालणार विषय आहे आणि कधी कधी अशी एखादी केस महत्वाची वाचनात येते ज्याची माहिती सर्वांना असणे गरजेची आहे, अशीच एक केस आहे संयुक्त बँक मुदत ठेव आणि ठेव खातेदारांच्या अधिकारांची. आज गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असले तरी मुदत ठेवी म्हणजेच फिक्सड डिपॉजिट बद्दल अजूनही लोकांना विश्वास वाटतो. ह्या मुदत ठेवी स्वतंत्र (सोल होल्डर) किंवा संयुक्त (जॉईंट, किंवा आयदर ऑर सर्व्हायवर - म्हणजेच दोघांपैकी कोणीही एक ) अश्या पद्धतीमध्ये नवरा -बायको, आई-वडील आणि मुले ह्यांच्यामध्ये केल्या जातात. अश्या संयुक्त मुदत ठेवी दुसऱ्या खातेदाराच्या (होल्डर) संमतीशिवाय तारण /गहाण ठेवता येतात का, असा प्रश्न मा. सर्वोच्च न्यायालयापुढे 'अनुमती विरुद्ध पंजाब नॅशनल बँक (AIR २००५ एस.सी. २९)' या केस मध्ये उपस्थित झाला. ह्या केसची थोडक्यात पार्श्वभूमी बघू या. याचिकाकर्ती आणि तिचा पती, ह्यांची 'आयदर ऑर सर्व्हायवर' ह्या प्रकारची मुदत ठेव असते. मात्र पतीदेव एका कर्जास ...