ध्वनिप्रदूषण - सायलेंट किलर.. ॲड. रोहित एरंडे.©
ध्वनी प्रदुषण : कर्णा, भोंगा किंवा डीजे - कायदा सगळ्यांना सारखाच.. मागील काही दिवसांत डीजे स्पिकरच्या भिंती मुळे होणाऱ्या प्रचंड आवाजामुळे २-३ लोकांना प्राण गमवावे लागले अश्या बातम्या ऐकल्या. एकंदरीतच ध्वनी प्रदुषण हा सायलेंट किलर म्हणून ओळखला जातो, एवढे दूरगामी परिमाण त्याचे शरीरावर होतात. ध्वनिप्रदूषणाला बंदीच : १. "राईट टू स्पिक " या घटनात्मक अधिकारात लाऊड स्पीकर वरून मोठ्याने आवाज करणे अभिप्रेत नाही.जर एखाद्याला आवाज करायचा अधिकार असेल, तर दुसऱ्या व्यक्तीला तो न ऐकण्याचाहि अधिकार आहे. प्रत्येकाला सन्मानाने , स्वखुशीने आणि शांत वातावरणात जगण्याचा घटनात्मक अधिकार आहे. ह्या अधिकारात किडा - मुंगी सारखे जगणे त्यामुळेच अभिप्रेत नाही असे हि कोर्टाने पुढे म्हणले आहे. ह्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या २००० सालच्या चर्च ऑफ गॉड विरुद्ध के के आर मॅजेस्टिक या निकालाचा आधार घेतला गेला ज्यामध्ये मध्ये असे स्पष्टपणे म्हणले आहे कि," मोठ्यांदी स्पीकर लावून किंवा जोरजोरात वाद्ये वाजवून, इतरांची शांतता भंग करून, प्राथर्ना-पूजा अर्चा करावी असे कुठलाही धर्म स...