बक्षीस पत्राबद्दल - थोडक्यात पण महत्वाचे .. ऍड. रोहित एरंडे ©
बक्षीस पत्राबद्दल - थोडक्यात पण महत्वाचे .. ऍड. रोहित एरंडे © अमुक एका व्यक्तीने तिची सर्व मिळकत एका प्रसिध्द नटास बक्षिस दिली, कोण्या उद्योगपतीने त्याची मिळकत त्याच्या हयातीमध्ये कोणालातरी दान केली अश्या बातम्या काही काळात वाचण्यात आल्या होत्या. गंमत म्हणजे अश्या बातम्यांची सर्व सामान्य लोकांना भुरळ पडते आणि आपल्यालाही असे सोप्या पद्धतीने स्वतःची मिळकत बक्षीस देता येईल का किंवा कसे असे अनेकांनी विचारणा केली आणि 'व्हाट्सअप विद्यापीठाचेही दाखले दिले !! आणि परत एकदा आपल्याकडे कायद्याचे अज्ञान म्हणा किंवा अपुरे ज्ञान किती आहे हे प्रकर्षाने जाणवले. त्यामुळे ह्या लेखाच्या निमित्ताने बक्षीस पत्र ज्याला इंग्रजी मध्ये गिफ्ट डिड म्हणतात, त्याची थोडक्यात माहिती घेऊ. सर्वप्रम हे लक्षात घ्यावे कि एखाद्या मिळकतीमधील मालकी हक्क हा कुठल्याही २ किंवा अधिक व्यक्तींच्या हयातीमध्ये खरेदीखत, हक्कसोड पत्र, वाटप-पत्र किंवा बक्षीसपत्र यांसारख्या नोंदणीकृत दस्तानेच तबदील केला जाऊ शकतो. तसेच एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर मिळकतीमधील मालकी हक्क हा मृत्यूपत्रा...