पक्षांतर बंदी कायदा म्हणजे नक्की काय ? ऍड. रोहित एरंडे. पुणे. ©
पक्षांतर बंदी कायदा म्हणजे नक्की काय ? ऍड. रोहित एरंडे. पुणे. © एखाद्या सुपर कॉम्पुटरला मागे टाकेल एवढ्या वेगात चालणाऱ्या नाट्यमय राजकीय घडामोडींमध्ये 'पक्षांतर बंदी कायदा' लागू करावा लागतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि आपापले आमदार फुटू नयेत म्हणून आमदारांवर पंचतारांकित हॉटेल मध्ये ठेवण्यात आले होते. पक्षांतर बंदी कायदा म्हणजे स्वंतत्र कायदा आहे का आणखी काही , ह्याची थोडक्यात माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करू. "आया राम गया राम " ही उपाधी पक्षांतर करणाऱ्या आमदार -खासदारांसाठी नेहमी वापरली जाते. ह्याचा उदय झाला हरियानामधील पतौडी विधानसभा क्षेत्रामधील श्री. गया लाल ह्या आमदारामुळे. हे महाशय त्यांची राजकीय निष्ठा बदलण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी इतके वेळा पक्ष् बदलले आणि एकदा तर म्हणे त्यांनी एका दिवसात ३ वेळा पक्ष बदलले आणि त्यामुळे "आया राम गया राम " ही उपाधी प्रचलित झाली. मात्र अश्या प्रकारचे राजकारण काही नवीन नाही. आपल्या वैयत्तीक आकांक्षांसाठी आपण ज्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आलो, त्याला तिलां...