७/१२ उतारा आणि फेरफार : समज कमी गैरसमज फार : मा. सर्वोच्च न्यायालय. ॲड. रोहित एरंडे ©
( "सर्वोच्च") सोनाराने कान टोचले की समजते... (७/१२ - फेरफार / प्रॉपर्टी कार्ड सारख्या ) महसुली / रेव्हेन्यू उताऱ्यामधील नोंदी ह्या महसुली उपयोगाकरिता असल्यामुळे ह्या नोंदीमुळे कुणाचाही मालकी हक्क हिरावून घेतला जाऊ शकत नाही किंवा कोणालाही मालकी हक्क प्रदान केला जात नाही" . "मृत्युपत्राचा अंमल हा मृत्युपत्र करणारा मयत झाल्यानंतरच होतो" मा. सर्वोच्च न्यायालय ऍड. रोहित एरंडे © "नावावर जागा करणे" किंवा "७/१२ वा प्रॉपर्टी कार्डला नाव लावणे" या बाबतीत लोकांमध्ये अनेक गैरसमज दिसून येतात. बहुसंख्य लोकांना असे वाटत असते की, ७/१२ च्या उताऱ्याला किंवा प्रॉपर्टी कार्डला किंवा लाईट बिलावर नाव लावायचा अर्ज दिला कि झाले किंवा तहसीलदार ऑफिस मध्ये नुसता अर्ज करून मिळकतीवर आपले नाव कमी करता येते किंवा आपल्याबरोबर आपल्या बायका - पोरांचे नाव मालक म्हणून लावता येते. म्हणजेच एकदा का ह्या उताऱ्यांवर आपले नाव लागले की आपण मालक झालो आणि नाव गेले कि आपला मालकी हक्क गेला. वस्तूथिती मा...