जागा नावावर करायची म्हणजे काय ? केवळ ७/१२,प्रॉपर्टी कार्ड, लाईट बिल, टॅक्स पावती ह्यांनी जागेचा मालकी हक्क का ठरत नाही ? Adv. रोहित एरंडे. ©
जागा नावावर करायची म्हणजे काय ? ७/१२,प्रॉपर्टी कार्ड, लाईट बिल, टॅक्स पावती ह्यांनी जागेचा मालकी हक्क का ठरत नाही ? Adv. रोहित एरंडे. © "मला माझ्या मुलाच्या 'नावावर' जागा करायची आहे" , "माझ्या बरोबर माझ्या बायकोचेही 'नाव' प्रॉपर्टीवर लावायचे आहे", "माझे नाव लाईट बिलावर लागले आहे" असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतील. "नावावर जागा करणे" किंवा "७/१२ वा प्रॉपर्टी कार्डला नाव लावणे" या बाबतीत अनेक लोकांमध्ये गैरसमज दिसून येतात. बहुसंख्य लोकांना असे वाटत असते की, तहसीलदार ऑफिस मध्ये ७/१२ च्या उताऱ्याला किंवा प्रॉपर्टी कार्डला नाव लावायचा अर्ज दिला कि मिळकतीवर आपले नाव कमी करता येते किंवा आपल्याबरोबर आपल्या बायका-पोरांचे नाव मालक म्हणून लावता येते. म्हणजेच एकदा का ह्या उतरायांवर आपले नाव लागले की आपण मालक झालो आणि नाव गेले कि आपला मालकी हक्क गेला. वस्तूथिती मात्र उलटी आहे, त्याची थोडक्यात माहिती घेऊ. एखाद्या मिळकतीमध्ये मालकी हक्क हा कुठल्याही २ किंवा अधिक व्यक्तींच्या...