कॉमन /ओपन पार्किंग बिल्डर विकू शकत नाही .- ऍड. रोहित एरंडे ©
कॉमन /ओपन पार्किंग बिल्डर विकू शकत नाही . प्रश्न : March 02nd मी अंबरनाथ येथील एका सोसायटीत फेब्रुवारी2020 मध्ये बंदिस्त गॅरेज खरेदी केलेले आहे,त्याची सह दुय्यय निबंधक यांचेकडे मुद्रांक शुल्क भरून नोंदणी केलेली आहे ,तसेच या गॅरेजला नगरपालिका ने व्यावसायिक दराने मालमत्ता कर आकारणी केली आहे.या गॅरेजला सभासदत्व देण्यासाठी सोसायटी ने नकार देत सुप्रीम कोर्टाच्या नाहलचंद लालूचांद वि पांचाली सोसायटी 2010 या निर्णयाचा आधार घेतलेला आहे .हे योग्य आहे का ? मी सोसायटी चा सभासद होण्यास पात्र आहे का ? सोसायटी सभासदत्व देत नसल्यास काय करावे . शफिक शेख ,अंबरनाथ उत्तर : आपली केस थोडी युनिक आहे असे वाटते. सर्वप्रथम आपण खरेदी केलेली जागा हि , सर्वसामान्य भाषेत ज्याचा उपयोग वाहने लावण्यासाठी होतो त्यास्वरूपाची आहे, का फ्लॅटसारखे एक स्वतंत्न युनिट (सदनिका) आहे, हे तपासायला पाहिजे आणि त्यासाठी मंजूर बांधकाम नकाशामध्ये आणि आपल्या करारामध्ये काय लिहिलेले आहे हे तपासणे गरजेचे आहे. कारण ते एक स्वतंत्र युनिट असल्यास सभासदत्व मागण्याचा आपल्या...