डॉक्टर वाचले तरच आपण वाचू, हे लोकांना कधी समजणार ? ऍड. रोहित एरंडे ©
डॉक्टर वाचले तरच आपण वाचू, हे लोकांना कधी समजणार ? ऍड. रोहित एरंडे © प्रसांग १ - "बोलठाण, नाशिक येथील बालरोगतज्ञाला १२ टाके पडेस्तोपर्यंत मारहाण, कारण काय तर त्याने दिलेल्या औषधाने लहान बाळाला थोडी झोप आली. प्रसंग -२ : कोरोना उपचार करणाऱ्या मालेगाव येथील एका डॉक्टरला, आमदाराचा . फोन घेतला नाही म्हणून मारहाण.. एकीकडॆ कोरोना जागतिक महामारीमध्ये सरकार बरोबर सर्वात पुढे होऊन डॉक्टर आणि त्यांचे सहकारी जीवाचे रान करीत आहेत आणि दुसरीकडे असे कृतघ्नपणाचे प्रकार घडत आहेत. डॉक्टरांवरील हल्ल्याच्या या लागोपाठ घडल्यामुळे वैद्यकीय विश्वात खळबळ उडाली आहे. भारतामधील खूप कमी डॉक्टर असे असतील ज्यांना कधी अश्या प्रकारच्या प्रसंगांना सामोरे जायला नसेल. एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते की इतर कुठल्याही प्रोफेशन पेक्षा डॉक्टरांना देवाचे दुसरे रूप म्हणून ओळखले जाते आणि इथे भक्तांची गल्लत होते. डॉक्टर जर का देव असेल, तर त्याची विटंबना (हल्ला )करू नका....आणि...डॉक्टर जर का देव नसेल तर, त्याच्या मर्यादा ओळखा... डॉक्टर, रुग्णालये यांच्...