Posts

Showing posts from April 26, 2023

प्राणीप्रेमासाठी इतर सभासदांवर अन्याय नको. ऍड. रोहित एरंडे ©

 प्राणीप्रेमासाठी इतर सभासदांवर अन्याय नको. ऍड. रोहित एरंडे  © प्रश्न : सर, आम्ही ज्या फ्लॅट मध्ये राहतो, त्याच्या वरच्या फ्लॅट मधील व्यक्तींनी त्यांच्या गॅलरीमध्ये कबुतरांना खायला घालण्यासाठी मोठा ट्रे उभारला आहे. ह्या ट्रेमध्ये ते रोज कबुतरांना खायला दाणे आणि पाणी ठेवतात. पण त्यामुळे आमच्या खालच्या गॅलरीमध्ये कबुतरांची घाण, पिसे, दाणे असा कचरा होतो. वरील सद्गृहस्थांना सांगितल्यावरही ते थांबत नाहीत आणि उलट पक्षांना दाणे खायला घालणे हे पुण्याचे काम आहे असे सांगतात. सोसायटी देखील हा प्रश्न तुमचा तुम्ही सोडवा असे सांगत आहे. ह्या होणाऱ्या घाणीमुळे आमच्या आरोग्याचाही प्रश्न  निर्माण झाला आहे. तरी ह्याबाबत काय करता येईल ? त्रस्त सभासद, मुंबई.  उत्तर : आपल्या प्रश्नाचे उत्तर मा. मुंबई उच्च न्यायालयाने काही वर्षांपूर्वीच जिग्नेश ठाकोर विरुद्ध दिलीप शहा , २०१६(६) महा. law जर्नल , पान क्र. ३७४, मा. न्या. आर. एम . सावंत, ह्या निकालात दिले आहे.  ) या निकालात "आपल्या वागणुकीमुळे शेजारच्यांना त्रास होऊ नये" ह्या नागरिक शास्त्रातील अतिशय मूलभूत परंतु महत्वाच्या शिकवणुकीवर शिक्का मोर्तब केल