Posts

Showing posts from March 30, 2024

नागरीकत्व कायदा समज - गैरसमज : ऍड. रोहित एरंडे.©

  नागरीकत्व कायदा   समज - गैरसमज :  ऍड. रोहित एरंडे.© कायदा म्हणले कि आपल्याकडे समाज कमी गैरसमज फार असे दिसते. मगे ते नॉमिनेशन नि मालकी मिळते किंवा ७/१२ नि मालकी मिळते हे गैरसमज असोत किंवा नागरिकत्व कायदा असो. या आधी CAB  आणि आता CAA (Citizenship Amendment Act ) या बाबतीत किती गैरसमज आहेत ये आपल्याला लक्षात येईल. अनेकांना हे माहितीच नसेल नागरीकत्व कायद्यामधील दुरुस्तीवरून ज्यालाच CAB (Citizenship Amendment Bill ) म्हणतात त्याला यापूर्वीच   ११ डिसेंबर २०१९ रोजी संसदेने मंजुरी देऊन १२ डिसेंबर रोजी तशी अधिसूचना  निघाली आणि नागरिकत्व कायदा (सुधारित) अस्तित्वात देखील आला.  मात्र सदरील कायद्यातील नियमावली (Rules ) सरकारने जारी केली  नसल्याने त्या कायद्याची अंमलबजावणी सुरु झाली नव्हती. तदनंतर पुढची २ वर्षे कोव्हीड मध्ये गेल्यामुळे आणि नंतर अनुच्छेद ३७०, राममंदिर अश्या विषयांमुळे कदाचित हा  विषय मागे पडला असावा, तो आधीच्या  निवडणुकीच्या जाहीरनाम्यात होता म्हणून दुसऱ्या निवडणुकीच्या आधी त्याची पूर्तता करण्यासाठी म्हणा, तशी नियमावली सरकारने १२ मार्च २०२४ रोजी जारी केली आणि कायद्याची अंमलबजावणी स