Posts

Showing posts from September 17, 2018

जम्मू-काश्मीर - "३७०" अंशात फिरणारे राज्य !

जम्मू-काश्मीर - "३७०" अंशात फिरणारे राज्य ! Adv. रोहित एरंडे सध्या काही काळापासून    "पृथ्वीवरील स्वर्ग" असे समजल्या जाणाऱ्या जम्मू- काश्मीर मधील  परिस्थिती काळजी निर्माण   करणारी बनली आहे. काही काळापूर्वी भाजपाने पाठिंबा काढल्यामुळे तेथील सरकार  कोसळले. त्यातच सामान्य जनता, सरकार, आणि अतिरेकी असा धोकादायक त्रिकोण तयार झाला. नुकत्याच झालेल्या पुलवामामधील भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे  परत एकदा कलम ३७० भोवती चर्चा फिरू लागली आहे. जम्मू-काश्मीर इलाख्याला आपल्या राज्यघटनेतील कलम ३७० नुसरत विशेष दर्जा प्राप्त झाला आहे.  आपली पैकी अनेकांना आश्चर्य वाटेल कि स्वतःची  स्वतंत्र घटना अस्तित्वात (२६ जानेवारी १९५७) असणारे जमु-काश्मीर हे एकमेव राज्य आहे  . ह्या घटनेतिल तरतुदी ह्या बहुतांशी भारतीय राज्य घटनेवरच आधारित आहेत  घटनेच्या सरनाम्याप्रमाणे (preamble ) जम्मू-काश्मीर हा भारताचाच अंतर्गत भाग आहे. सध्याच्या पार्श्वभूमीवर ह्या   तरतुदींची थोडक्यात माहिती करून घेण्याचा आपण प्रयत्न करू. जम्मू-काश्मीरच्या महाराजांनी सुरुवातीला काही अटी  आणि शर्थींवरच भारतामध्ये