वडिलोपार्जित मिळकतीमध्ये बहिणींना समान हक्क : ॲड. रोहित एरंडे ©
वडिलोपार्जित मिळकतीमध्ये बहिणींना समान हक्क : ॲड. रोहित एरंडे © वडिलोपार्जित मिळकतीमध्ये बहिणींना समान हक्क : आम्ही एकूण २ बहिणी आणि २ भाऊ. आमची काही पिढ्यांपासूनची वडिलोपार्जित मिळकत आहे. दोन्ही बहिणींचे लग्न १९९४ पूर्वी झाले आहे आणि तरीही आता त्या मिळकतींमध्ये हक्क सांगत आहेत. त्यांना लग्नात सर्व काही दिले आहे आणि म्हणून आम्ही हक्कसोडपत्र मागत आहोत, तर त्याला त्या नकार देत आहेत. तर आता बहिणींना आमच्या वडिलोपार्जित मिळकतींमध्ये हक्क आहे का ? एक वाचक, पुणे. बहीण-भावाचे खरे प्रेम हे भाऊबीजेला नाही तर सब-रजिस्ट्रार कचेरीत कळते असे कोर्टात गंमतीने म्हटले जाते. कायद्याच्या अज्ञानाने नात्यामध्ये वितुष्ट कसे येऊ शकते हे आपल्या प्रश्नावरून दिसून येते. वडिलोपार्जित (ancestral ) आणि वडिलार्जित (स्वकष्टार्जित)) या मिळकतीच्या हक्कांमध्ये खूप फरक आहे . वडिलोपार्जित मिळकतींमध्ये मुलींना मुलांप्रमाणेच समान हक्क मिळण्यासाठी हिंदू वारसा कायदा १९५६ च्या कलम...