Posts

Showing posts from April 30, 2025

छळणुकीपासून डॉक्टरांना 'सर्वोच्च' दिलासा ॲड. रोहित एरंडे ©

  छळणुकीपासून डॉक्टरांना 'सर्वोच्च' दिलासा ॲड. रोहित एरंडे © सर्वच डॉक्टरांना एकच चष्म्यातून बघणे चुकीचे आहे. उडदामाजी काळे-गोरे असणारच. न्यायालयाचा वैद्यकीय निष्काळजीपणाबद्दलचा दृष्टिकोन कायम संयत राहिला आहे. त्याबद्दल थोडेसे..  * वैदयकशास्त्राला Incomplete Science असे संबोधले जाते.* वैद्यकशास्त्राचे मानवजातीवर अनंत उपकार आहेत. ते एक अत्यंत प्रगत असे शास्त्र असून, दररोज त्यात काहीतरी नावीन्यपूर्ण शोध लागत आहेत. मात्र, असे असले तरी वैद्यकशास्त्राला परिपूर्ण शास्त्र असे म्हणता येणार नाही इतका त्याचा आवाका मोठा आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती असल्याने उपचारांचा परिणामही वेगवेगळा ठरतो. एखाद्या आजारावर उपचार करण्याच्या वेगवेगळ्या; पण मान्यता प्राप्त व वापरलेल्या पद्धती असू शकतात. प्रत्येक पद्धतीचे फायदे व तोटे असतात. अशापैकी प्राप्त परिस्थितीत डॉक्टरांनी त्यांच्या ज्ञानाच्या व कौशल्याच्या आधारे निवडलेल्या उपचारपद्धतीला यश न आल्यास त्या डॉक्टरला वैद्यकीय निष्काळजीपणासाठी दोषी धरायचे का, असा प्रश्न कुसुम शर्मा वि. बात्रा हॉस्पिटल (AIR 2010 SC 1050) या याचिकेच्या निमित्ताने सर्वोच्...