Posts

Showing posts from February 25, 2025

"सर्वात शेवटचे मृत्युपत्र ग्राह्य धरले जाते" _ ॲड. रोहित एरंडे ©

"सर्वात  शेवटचे मृत्युपत्र ग्राह्य धरले जाते"  मी माझे मृत्युपत्र सुमारे १० वर्षांपूर्वी करून ठेवले आहे आणि मृत्युपत्राने माझी मिळकत माझ्या दोन्ही मुलांना समान पध्दतीने दिली होती, मुलीला मात्र काहीही दिले नव्हते कारण तिच्या लग्नात तिला जे द्यायचे ते मी आणि माझ्या पत्नीने दिले होते.   मात्र आता परिस्थितीमध्ये बराच बदल झाला असून मला मुलांना काहीही द्यायची इच्छा नसून  सर्व माझ्या मुलीला द्यायचे आहे. तर मला आता नवीन मृत्युपत्र करता येईल का ? त्यास मुले आक्षेप घेऊ शकतील का ? एक वाचक, पुणे.  खरेदिखत, बक्षिस पत्र, हक्कसोड पत्र  इ. दस्त   एकदा अंमलात आले कि ते परत बदलता येत नाहीत, पण मृत्युपत्र हा असा एकमेव दस्त आहे कि तो कितीवेळा बदलता येतो आणि सर्वात शेवटचे मृत्युपत्र हे कायद्याने ग्राह्य धरले जाते (संदर्भ : के. अम्बुनी वि. एच. गणेश भंडारी  AIR 1995 SC 2491),. कारण मृत्युपत्राची अंमल हा मृत्यूपत्रकरणारा मयत झाला कि मगच सुरु होतो. आपल्या हयातीमध्ये आपण मृत्युपत्र करून ठेवले असले तरी जो पर्यंत आपण जिवंत आहोत तो पर्यंत मृत्यूपत्र म्हणजे फक्त एक क...