दोनपेक्षा जास्त मुले असल्यास सोसायटी निवडणूक लढविण्यास अपात्र ? ऍड. रोहित एरंडे ©
दोनपेक्षा जास्त मुले असल्यास सोसायटी निवडणूक लढविण्यास अपात्र ? ऍड. रोहित एरंडे © सर, आमच्या सोसायटीमध्ये काही सभासदांना २ पेक्षा जास्त मुले आहेत , तर असे सभासद सोसायटी समितीची निवडणूक लढविण्यास अपात्र ठरतात का ? या बाबतीत मुंबई उच्च न्यायालयाचा काही निकाल आल्याचे समजते. परंतु या निकालाचा नक्की अर्थ काय हे आम्हाला समजत नाही, जो तो सोयीचा अर्थ लावत आहे. तरी विनंती कि , कृपया या बाबत नेहमीप्रमाणे सोप्या शब्दांत खुलासा करावा. एक वाचक, पुणे. आपल्या सारखे प्रश्न अनेकांना पडले आहेत आणि व्हाट्सअप विद्यापीठावर तर लोकांनी नानाविवीध अर्थ काढले असल्याचे दिसून येईल. तर लोकसंख्या नियंत्रणाचाच एक भाग म्हणून २००० साली सर्वप्रथम दि बॉंबे व्हिलेज पंचायत ऍक्ट मध्ये दुरुस्ती करून २ पेक्षा जास्त अपत्ये असलेल्या व्यक्तीस पंचायत निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले गेले, अर्थात त्याला काही अपवाद पण होते. त्याच धर्तीवर ७ सप्टेंबर २००१ मध्ये महाराष्ट्र सहकार कायद्यातील कलम 73 CA (1)(i)(f) मध्ये दुरुस्ती करून समिती सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी...