Posts

Showing posts from February 4, 2025

फ्लॅटवरील कर्ज आणि रिडेव्हलपेमेंटसाठी बँकेची संमती . : ॲड. रोहित एरंडे

फ्लॅटवरील  कर्ज आणि  रिडेव्हलपेमेंटसाठी बँकेची  संमती .  आमच्या  सोसायटीची  रिडेव्हलपेमेंट प्रोसेस सुरु झाली आहे आणि आता डेव्हलपमेंट ऍग्रिमेंट रजिस्टर होणार आहे. मी माझा फ्लॅट तारण ठेवून एका बँकेकडून रितसर कर्ज घेतले आहे. बिल्डर आणि सोसायटीने मला त्या बँकेचे ना-हरकत प्रमाणपत्र (NOC ) आणण्यास सांगितले आहे. मात्र मी अनेकवेळा विनवण्या करूनही बँक NOC देण्यास टाळाटाळ करत आहे आणि आता सोसायटीवालेही   मलाच दोष देत आहेत . अश्या परिस्थितीत काय करता येईल ? एक त्रस्त सभासद,  पुणे.  रिडेव्हलपेमेंट (पुनर्विकास) मध्ये निर्माण  होणारे प्रश्न बघता  त्यासाठी एक सर्वसमावेशक  कायदा बनविण्याची वेळ आली आहे. स्वतःच्या फ्लॅटचे " टायटल" निर्वेध आणि निजोखमी  आहे अशी कबुली  प्रत्येक सभासदाकडून बिल्डर लिहून घेतो. कारण बहुतेक रिडेव्हलपेमेंटमध्ये   कुठल्यातरी सभासदांनी फ्लॅटवर कर्ज घेतलेले असते, असे दिसून येते आणि  जर कर्ज असेल तर   त्यावर बँकेचा चार्ज रहात असल्यामुळे कर्ज फिटेपर्यंत  फ्लॅट ट्रान्सफर संदर्भात कुठ...