"फ्लॅटचे बुकिंग कॅन्सल केल्यास सर्व पैसे परत द्यावेत" - : ॲड. रोहित एरंडे ©
"फ्लॅटचे बुकिंग कॅन्सल केल्यास सर्व पैसे परत द्यावेत" - महारेरा प्राधिकरण : ॲड. रोहित एरंडे © असाच काहीसा प्रकार ज्येष्ठ नागरिक असलेल्या श्री. किशोर छेडा यांच्या बाबतीत २०१७ साली घडला. श्री. किशोर छेडा- तक्रारदार यांनी गोदरेज प्रॉपर्टीज च्या कुर्ला, मुंबई येथील "द ट्रीज, ओरिजिन्स " या मोठ्या गृहप्रकल्पात सूमारे ४. ४० कोटी रुपये किंमत असलेला एक प्रशस्त फ्लॅट बुक केला आणि बिल्डर-कंपनीने सांगितल्याप्रमाणे त्यांनी बुकिंग-रक्कम म्हणून रु. १५ लाख रुपये भरले आणि पैसे मिळाल्याचा ई-मेल देखील कंपनीने ५ मे २०१७ रोजी तक्रारदारांना पाठवला. तदनंतर, 'अचानक उद्भवलेल्या घरगुती अडचणींमुळे पुढील पैसे भरणे मला शक्य नाही, सबब फ्लॅटचे बुकिंग रद्द करावे आणि मी भरलेले रु.१५ लाख रुपये परत करावे" अश्या आशयाचा एक ई-मेल दि. ८ मे २०१७ रोजी तक्रारदारांनी कंपनीला पाठवला. मात्र हा ई-मेल मिळूनही कंपनीने तक्रारदारांना पुढील हप्ते वेळेत भरा या आशयाचा ई-मेल पाठवला. त्यावर तक्रारदारांनी आधीच्या बुकिंग रद्द करण्याचा ई-मेल चा संदर्भ देऊन परत एकदा रक्कम परताव्याची मा...