अपार्टमेंटची सोसायटी करणे कायद्याने बंधनकारक नाही. ऍड. रोहित एरंडे. ©
अपार्टमेंटची सोसायटी करणे कायद्याने बंधनकारक नाही. ऍड. रोहित एरंडे. © सर, आमच्या सारख्या छोट्या शहरांमध्ये बरेच वर्षांपासून अपार्टमेंट करण्याची पद्धत आहे. मात्र काही दिवसांपासून आमच्या इथे तसेच सांगली, मिरज, कऱ्हाड या भागात देखील अपार्टमेंटची सोसायटी केली नाही तर तुमचे मालकी हक्क जातील अशी भिती लोकांच्या मनात बिंबवली जात आहे आणि त्यामुळे आम्ही बांधलेल्या जुन्या बिल्डींगमधले लोकं देखील आता साशंक झाली आहेत. तर अपार्टमेंटची सोसायटी करता येते का आणि करणे बंधनकारक आहे का आणि यासाठी आमची संमती गरजेची आहे का ? एक बांधकाम व्यावसायिक, कोल्हापूर सर्वप्रथम एखादी गोष्ट कायद्याने करावीच लागते आणि एखादी गोष्ट कायद्याने करता येते , हा महत्वाचा फरक कायम लक्षात घ्यावा. उदा. वय वर्षे १८ आणि २१ पूर्ण झाल्यावर अनुक्रमे मुली आणि मुले कायदेशीरपणे लग्न करू शकतात, पण ह्याचा अर्थ त्या वयाचे झाल्यावर लग्न करायलाच पाहिजे असे नाही. असे उदाहरण द्यायच...