पुनर्विकास - जागा मालक - बिल्डर च्या वादात रहिवाश्यांनी काय करायचे ? - ॲड. रोहित एरंडे ©
मुंबईतील ताडदेव परिसरातील जरिवाला चाळ व बिल्डींग , शंभर वर्षे जुन्या पाच चाळी आणि तीन मजली इमारत आहे. सन २००३ मध्ये जागामालक आणि बिल्डर यांच्यामध्ये सुमारे दोन कोटींचा जमीन खरेदी व्यवहार झाला. बिल्डरने देऊ केलेली ही रक्कम मालकाने स्विकारली नाही आणि करार मोडला. मालकाविरुद्ध बिल्डर उच्च न्यायालयात गेला आणि याचिका दाखल केली. याचिकेवरील सुनावणी दरम्यान बिल्डरला करारामध्ये ठरलेली रक्कम कोर्टात जमा करण्यास सांगण्यास आले. बिल्डर आणि मालकातील हा वाद न्यायालयीन प्रक्रियेत अडकला आहे. जीर्ण झालेल्या खोल्यांमध्ये रहिवाशी अनेक समस्यांचा सामना करीत जीव मुठीत घेऊन राहत आहेत. रहिवाशांना पुर्नविकास हवा आहे मात्र प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने मार्ग सुचत नाही. कृपया मार्गदर्शन करावे. एक रहिवाशी, ताडदेव.. या सर्व प्रकरणामध्ये बिल्डर आणि जागा मालक यांच्यामधील करारनामे आधी बघणे गरजेचे आहे आणि हि कागदपत्रे तुमच्याकडे असतील असे गृहीत धरतो. समजा नसल्यास, हे (विकसन) करारनामे नोंदणीकृत करावे लागत असल्यामुळे ते पब्लिक डॉक्युमेंट होतात आणि त्याची सही-शिक्क्याची (सर्टिफाईड) प्रत तुम्हा...