व्यक्ती बेपत्ता ? सात वर्षे थांबा ! - ॲड. रोहित एरंडे ©
व्यक्ती बेपत्ता , मग ७ वर्षे थांबा !! ॲड. रोहित एरंडे. © एखादी व्यक्ती बेपत्ता असेल, म्हणजेच एखाद्या व्यक्तीचा काहीही थांगपत्ता लागत नसेल किंवा ती व्यक्ती परांगदा झाली असेल तर त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना आपल्याला कल्पनाही येणार नाही अश्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यामध्ये मानसिक त्रास तर असतोच, पण विविध कायदेशीर प्रश्नांना सामोरे जावे लागते. ह्या संबंधातील (अपुऱ्या ) कायदेशीर तरतुदी काय आहेत ह्याची थोडक्यात माहिती घेवू. हरविलेला भाऊ किंवा नातलग एखाद्या नाट्यमय घटनेनंतर गायब होतो आणि अनेक वर्षांनंतर अवतीर्ण होतो तो हिंदी चित्रपटातच, पण वास्तवात मात्र फार क्वचितच असे घटते आणि त्या बेपत्ता व्यक्तीचे नातलग मात्र संभ्रमात राहतात. *बेपत्ता व्यक्ती 'मृत' घोषीत करण्यासाठी त्या व्यक्तीबद्दल ७ वर्षे काहीही माहिती नाही, हे सिद्ध करावे लागते.* एखादी व्यक्ती खूप दिवसांपासून बेपत्ता असेल किंवा पूर, भूकंप सारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये सापडून ज्यांचा काहीच थांगपत्ता लागत नाही, अशा वेळी त्या बेपत्ता व्यक्तींना मृत मानायचे की नाही असा यक्षप्रश्न उभा राहतो. कारण अशा बेपत्ता व्यक...