मृत्युपत्रात काय लिहिले आहे याची पूर्वकल्पना मुलांना द्यावी काय ? - ॲड. रोहित एरंडे ©
मृत्युपत्रात काय लिहिले आहे याची पूर्वकल्पना मुलांना द्यावी काय ? सर, आम्ही आमच्या प्रॉपर्टीचे मृत्युपत्र करून ठेवणार आहोत आणि याची चर्चा आम्ही मुलांसमोर केली. तर आता आमची २ मुले त्यांना मृत्युपत्रामध्ये काय लिहून ठेवावे आणि मृत्युपत्र केल्यावर ते वाचायला मागत आहेत. तर अशी माहिती कायद्याने सांगावी काय ? आम्हाला या सर्वाचा ताण येऊन राहिला आहे. एक वाचक, नागपूर. तुम्ही विचारले तशी परिस्थिती कमी अधिक फरकाने बघायला मिळते आणि बऱ्याचदा पालकांची भावनिक स्थिती दोलायमान होते. त्यामुळे तुम्ही हा प्रश्न विचारून अनेक पालकांच्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली आहे असे म्हणता येईल. एकतर मृत्युपत्र हा अनेकांना मृत्युपत्राला दुसरे नाव इच्छापत्र असे हि आहे म्हणजेच मृत्यूपत्र करणाऱ्याच्या इच्छेने केली जाणारी मिळकतीची विभागणी, त्यामुळे मुलांच्या इच्छेने मृत्युपत्र केल्यास त्याला तुमचे इच्छापत्र कसे म्हणता येईल ? एकत्र कायद्यामध्ये मृत्युपत्र करण्याची पूर्वकल्पना मुलांना (लाभार्थी) द्यावी अशी कुठलीही तरतूद नाही आणि प्रत्येक मुलाला/मुलीला ...