Posts

Showing posts from April 22, 2025

केवळ लग्न झाले म्हणून सासू सासऱ्यांच्या मिळकतीमध्ये जावई-सुनेला मालकी हक्क मिळत नाही. ॲड. रोहित एरंडे. ©

  केवळ लग्न झाले म्हणून  सासू सासऱ्यांच्या मिळकतीमध्ये जावई-सुनेला  मालकी हक्क  मिळत नाही.  ॲड. रोहित एरंडे. © आम्हा नवरा बायकोचा स्वकष्टार्जित फ्लॅट आहे आणि आता रिडेव्हलपमेंट झाल्यावर खूप मोठा फ्लॅट आम्हाला मिळणार आहे. आम्हाला एकच मुलगा आह आणि आम्ही त्याच्या लग्नाचे बघत आहोत. थोडे ऑड वाटेल, पण    एकतर सध्या डिव्होर्स  केसेस वाढीस लागल्या आहेत. भविष्यात आमच्या मुलाच्या बाबतीत असे काही झाल्यास  आमच्या सुनेचा त्यावर  अधिकार राहील का ? फक्त मुलाच्या नावे आत्ताच  बक्षीसपत्र केले  तरी सुनेला हक्क मिळेल का ?   एक पालक, पुणे.  प्रॉपर्टी असली तरी त्रास, नसली तरी त्रास  असे म्हणतात.  मात्र जेव्हा असे वाद आपल्या रक्ताच्या नात्यातील लोकांशी होतात तेव्हा  संताप आणि मानसिक क्लेश या दोन्ही भावना एकाच वेळी दाटून येतात याचा अनुभव अनेकांनी घेतला असेल.  आपल्या प्रकरणामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे फ्लॅट तुमचा   स्वकष्टार्जित फ्लॅट आहे. त्यामुळे तुमच्या  हयातीमध्ये तर तुमच्या मुलाला सुध्दा यामध्ये क...