माफीचे साक्षीदार.... ॲड. रोहित एरंडे ©
माफीचे साक्षीदार.... ॲड. रोहित एरंडे © दयेची याचिका फेटाळून ७ वर्षांनंतरही फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीस अवास्तव आणि अनावश्यक उशीर झाल्याने आरोपींच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन झाले आहे आणि अशा उशीरामुळे त्यांच्यावर अमानुष परिणाम होतो, या कारणास्तव नुकत्याच दिलेल्या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयच्या न्या. अभय ओका, न्या. अमानुल्ला आणि न्या. ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने पुण्यात हिंजवडी येथेही एका कंपनीमध्ये महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या कॅब चालकाची आणि त्याच्या साथीदाराच्या फाशीच्या शिक्षेचे ३५ वर्षांच्या जन्मठेपेत रूपांतर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. सुमारे २ वर्षांपूर्वी याच उशिरास्तव माजी पंतप्रधान राजीव गांधी ह्यांच्या मारेकऱ्यांनाहि सर्वोच्च न्यायालयाने 'माफी' दिल्याने प्रतिक्रियांचा आगडोंब उसळला होता. आपल्याला आठवत असेल तर "निर्भया" बलात्कार प्रकरणातील नराधमांना नृशंस घटनेनंतर ७ वर्षांनी द...