दारू पिणे व उच्च रक्तदाब याचा कर्करोग होण्याशी संबंध विमा कंपनी सिध्द करू शकली नाही . ऍड. रोहित एरंडे ©
विमा कंपनीला उच्च न्यायालयाचा दणका . दारू पिणे व उच्च रक्तदाब याचा कर्करोग होण्याशी संबंध विमा कंपनी सिध्द करू शकली नाही . ऍड. रोहित एरंडे © वैद्कयीय विमा फेटाळला गेल्यावर विमा कंपनी आणि ग्राहक यांच्यामध्ये नेहमीच वाद होतात आणि विमा कंपनीची कारणे आणि ग्राहकांची स्पष्टीकरणे कधीच एकमेकांना मान्य होत नाहीत आणि मग कोर्टाची दारे ठोठवावी लागतात. दारू प्यायची सवय आणि उच्च रक्तदाब विमा कंपनीपासून लपवून ठेवली आणि या दोन्ही कारणांनी कॅन्सर (कर्करोग) होतो याचा कोणताही पुरावा न देता विमा क्लेम नाकारल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच विमा लोकपाल आणि विमा कंपनीला चांगलाच दणका दिला. या केसची थोडक्यात हकीकत बघू. विमाधारक - श्री. प्रकाश मेहता यांनी 2003 साली रॉयल सुंदरम या कंपनीकडून वैद्यकीय विमा पॉलिसी घेतली होती. 2021 साली मिळालेल्या सल्ल्याने त्यांनी केअर हेल्थ इन्शुरन्स या कंपनीकडे जुनी पॉलिसी पोर्ट केली आणि रु. 5 लाख रुपयांची नवीन पॉलिसी घेतली आणि कंपनीच्याच सल्ल्यावरून त्यांनी रु. 50 लाख रुपय...