पुनर्विकास : वैयत्तिक हट्टापायी बहुमताला वेठीस धरणे दंडास पात्र. - मुंबई उच्च न्यायालय. ॲड. रोहित एरंडे ©
पुनर्विकास : वैयत्तिक हट्टापायी बहुमताला वेठीस धरणे दंडास पात्र. - मुंबई उच्च न्यायालय ॲड. रोहित एरंडे © आमच्या सोसायटीची पुनर्विकास प्रक्रिया सुरु झाली. विशेष सभेमध्ये डेव्हलपरची देखील बहुमताने निवड झाली आहे. परंतु ४० पैकी ३-४ सभासद आता काहीही कारणे काढून विरोध करत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांना जो बिल्डर हवा होता त्याची नेमणूक होऊ शकली नाही. सोसायटीमधील बहुतांश सभासद आणि जे विरोध करीत आहेत ते सुध्दा आता जवळ जवळ ७० वर्षाच्या पुढे आहेत. त्यातील काही सभासद मी फ्लॅटला आताच रंग दिला आहे, मी नवीन फर्निचर केले आहे असे सांगून विरोध करीत आहेत.इतर सभासदांनी हात जोडून विनंती केली तरी हे सभासद आपला हेका - इगो सोडत नाहीत. अश्या सभासदांबाबत काही कायदेशीर कारवाई करता येईल का ? ज्येष्ठ सभासद, पुणे. पुनर्विकास (रिडेव्हलपमेंट) आणि विरोध या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कुठल्याही सोसायटीमध्ये सोसायटी सभासदांचा इगो किती मोठा आहे यावर सोसायटीची वाटचाल निर्वेधपणे चालेल कि नाही हे ठरते, असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. रिडेव्हलपम...