आले रे उत्सव , पण कायदे सांभाळा : "कायद्याचे अज्ञान" हा कधीही बचाव होऊ शकत नाही.. ॲड. रोहित एरंडे.©
आले रे उत्सव , पण कायदे सांभाळा : "कायद्याचे अज्ञान" हा कधीही बचाव होऊ शकत नाही.. ॲड. रोहित एरंडे.© जाणते -अजाणतेपणे कायदा मोडला गेल्यास "कायद्याचे अज्ञान" हा कधीही बचाव होऊ शकत नाही. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे गणेशोत्सव, दहीहंडी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. कार्यकर्त्यांच्या बैठका, ढोल-ताशांचा सराव देखील सुरु झाले आहेत . परंतु हे सर्व करताना उत्साहाच्या भरात आपल्या हातून कायद्याचा भंग तर होत नाहीना ह्याचे भान राखणे गरजेचे आहे. गेल्या काही काळात सर्व धर्मीय सण -समारंभांमुळे होणाऱ्या त्रासांविरुद्ध काही जनहित याचिका दाखल केल्या गेल्या आणि त्यावर मुंबई उच्च न्यायालायने, सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या निकालांचा आधार घेऊन, दिलेले निकाल खूपच स्पष्ट आहेत. दर वर्षी कोणी ना कोणीतरी ह्या संदर्भात उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावतोच.. कुठल्याही धर्माचा सण समारंभ असो, प्रमुख आक्षेप असतो ध्वनी प्रदुषण आणि मंडप. या बाबत न्यायालयीन निर्णय...