प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावरच फेडरेशनची स्थापना करता येईल - मुंबई उच्च न्यायालय - ॲड. रोहित एरंडे ©
प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावरच फेडरेशनची स्थापना करता येईल - मुंबई उच्च न्यायालय . ॲड. रोहित एरंडे © पूर्वी १- २ बिल्डिंग ची स्कीम असायची. मात्र अलीकडच्या काळात ५ पेक्षा जास्त बिल्डिंग किंबहुना टॉवर्स असलेले बांधकाम प्रकल्प असतात, कधी कधी स्वतंत्र रो-हाऊस . प्रत्येक बिल्डिंगचा मेंटेनन्स हा त्या त्या बिल्डिंगकडे असतो. परंतु अश्या मोठ्या प्रकल्पांमध्ये क्लब हाऊस, स्विमिंग टॅंक इ. सोयी सुविधा या सर्व सभासदनासाठी असतात आणि त्याच बरोबर इतर सामायिक सोयी-सुविधा म्हणजेच रस्ते, बगीचा, सिक्युरिटी यांचा खर्च कोणी करायचा आणि अश्या सामायिक सोया-सुविधांची मालकी कोणाकडे असे प्रश्न निर्माण होतात. रेरा कायद्याप्रमाणे ५१% बुकिंग झाले कि सोसायटी /अपार्टमेन्ट कायद्याप्रमाणे स्थापन करण्याची जबाबदारी बिल्डरवरती असते. जेव्हा एखाद्या प्रोजेक्ट मध्ये ५ किंवा त्या पेक्षा जास्त सोसायटी (एक बिल्डिंग एक सोसायटी असे) असतात अश्या सर्व बिल्डिंगची मिळून एक शिखर संघटना /सोसायटी ज्याला Co. Operative Association किंवा Federation ची स्थापना करता येत...