Posts

Showing posts from September 1, 2024

पिठोरी अमावास्या - भारतीय मातृदिन... ऍड. रोहित एरंडे ©

 पिठोरी अमावास्या - भारतीय मातृदिन...   ऍड. रोहित एरंडे  © फ.मु. शिंदे त्यांच्या प्रसिध्द "आई" या कवितेचा शेवट करताना म्हणतात "आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही... "  प्रेमस्वरूप - वात्सल्यसिंधू असे संबोधल्या गेलेल्या आईची महती सांगण्यासाठी वेगळ्या शब्दांची गरजही नाही. जगभरात 'मे'  महिन्याच्या दुसऱ्या रविवारी 'मदर्स डे' साजरा केला जातो  तसे बघितले तर प्रत्येक दिवस हा 'मदर्स डे'च असतो.. पण  मनुष्य हा उत्सवप्रिय प्राणी असल्यामुळे प्रत्येक कारणासाठी "दिनविशेष" असतोच. त्याचप्रकारे जगभरात आईसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी मे महिन्याच्या दुसर्‍या रविवारी 'मदर्स डे' (Mothers Day) साजरा केला जातो. तो साजरा कराच..    परंतु आपल्यापैकी अनेकांना कदाचित माहिती नसेल कि भारतामध्ये  कित्येक शतके  श्रावण महिना संपायच्या दिवशी म्हणजेच श्रावण  अमावस्येला ज्याला   'पिठोरी अमावस्या' म्हणतात, त्यादिवशी  'मातृदिन' म्हणजेच आत्ताच्या भाषेत 'मदर्स डे साजरा करण्याची पद्धत आहे.    पिठोरी अमावस्येदिवशी मातृदि