हा कसला विजय ?? वोकिझम चा भस्मासुर.. - ऍड. रोहित एरंडे.©
हा कसला विजय ?? वोकिझम चा भस्मासुर.. #olympics2024 इटालियन महिला बॉक्सर अँजेला कारिनी हीचे आधी घेतलेले अतोनात कष्ट आणि ऑलिंपिक पदक मिळवायचे स्वप्न केवळ ४५ सेकंदांमध्ये भंगले...समोर महिला स्पर्धक असती तर गोष्टच वेगळी होती. मात्र यावेळी प्रतिस्पर्धी होय अल्जेरियन बॉक्सर इमाने खेलीफ,जो गेल्या वर्षी नवी दिल्ली येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये जेंडर चाचणी पास न होऊ शकल्याने अपात्र ठरला होता.. पुरुषा सारखा शरीर यष्टी असणारा, पण स्त्री म्हणून खेळणारा हा खेळाडू...तो जन्मतः तसा असेल तर ठीक आहे, पण अश्या लोकांसाठी वेगळी कॅटेगरी ठेवून स्पर्धा घ्या.. " त्याचे पंचेस इतके जोरदार होते की एक महिला त्यापुढे टिकावच धरू शकत नाही आणि म्हणून मी जीवाच्या भीतीने सामना सोडला" ओक्साबोक्षी रडत अँजेला पत्रकारांना सांगत होती... त्याला स्वतः ला सिद्ध करायचे असेल तर माईक टायसन सारखे प्रतिस्पर्धी निवडावेत. नाही का ? २०२३ मध्ये अमेरिकेत अशीच घटना घडली. लीया थॉमस नावाचा मुलगा, उत्तम स्विमर, जो हार्मोन थेरपी घेऊन स्वतःला मुलगी समजू लागला, आणि एक दिवस मुलींच्या चेंजिंग रूम मध्ये जाऊन...