"पुनर्विकासादरम्यान सभासदांना मिळणारा ट्रान्झिट रेंट करप्राप्त नाही " ? ऍड. रोहित एरंडे ©
"पुनर्विकासादरम्यान सभासदांना मिळणारा ट्रान्झिट रेंट करप्राप्त नाही " ?" ऍड. रोहित एरंडे © पुनर्विकास -रिडेव्हलपमेंट हा सध्या परवलीचा शब्द बनला आहे. ठीक-ठिकाणी पुनर्विकासाचे अनेक प्रकल्प चालू झालेले आपल्याला दिसतील. पुनर्विकासामधील सर्वात महत्वाचा दस्तऐवज म्हणजे डेव्हलपमेंट ऍग्रिमेंट -विकसन करारनामा. या करारनाम्यामध्ये महत्वाच्या अटी -शर्ती लिहिलेल्या असतात ज्या बिल्डर आणि सोसायटी -सभासद यांच्यावर बंधनकारक असतात. यामध्ये वाढीव जागा किती मिळणार याचबरोबर पुनर्विकास सुरु झाल्यावर सभासदांना मिळणारे अन्य आर्थिक लाभ उदा. पर्यायी जागेसाठीचे भाडे, घर सामान हलविण्यासाठीचा ट्रान्सपोर्ट खर्च, पर्यायी जाग शोधण्यासाठीचे एजंटचे कमिशन, कॉर्पस फंड इ. गोष्टींचा उल्लेख केला जातो. या पैकी पर्यायी जागेसाठीचे भाडे किंवा ज्याला हार्डशिप / रिहॅबिलिटेशन / डिस्प्लेसमेंट अलाउन्स म्हंटले जाते तो विषय सभासदांच्या जिव्हाळ्याचा असतो. कारण जुनी जागा पाडल्यावर राहण्यासाठी / व्यवसायासाठी पर्यायी जागा प्रत्येक सभासदाला शोधावीच लागते आणि त्यासाठी नवीन जागेचा ताबा...