Posts

Showing posts from May 7, 2024

सामायिक जागेचा वापर खासगी कारणाकरिता अवैध. : ऍड. रोहित एरंडे. ©

  सामायिक जागेचा वापर खासगी कारणाकरिता अवैध.  आमच्या सोसायटीमध्ये पार्किंग समोर काही जागा सोडून लगेच सीमाभिंत आहे  एका सभासदाने त्याच्या पार्किंग समोरच्या  मोकळ्या जागेत चहाची टपरी सुरु केली आहे आणि सीमाभिंतीवरून बाहेरच्या लोकांना तो चहा, कॉफी असे पदार्थ देतो तर त्याचे किचेन त्यानी त्याच्या पार्किंगमध्येच  थाटले आहे. हे काढण्यासाठी त्याला विचारणा केल्यास तो अजिबात बधत नाही. कमिटी मध्ये सुध्दा कारवाई करावी कि नाही यात एकवाक्यता नाही.  तर अश्या सभासदविरुद्ध काय करता येईल ? सोसायटी कमिटी सदस्य  , पुणे.   एक लक्षात घ्यावे कि सोसायटी असो का अपार्टमेंट, सभासदाला   जसे  काही हक्क प्राप्त होतात त्याचबरोबर त्याला काही कर्तव्ये देखील पार पाडायची असतात आणि दोन्ही ठिकाणी सभासदाला सामायिक (common ) जागेचा वापर खासगी कारणाकरिता करता येत नाही.   जेवढी जागा करारनाम्याने मिळाली आहे तेवढीच जागा वापरण्याचा अधिकार सभासदाला असतो. मोकळी जागा दिसली कि ती "आपलीशी" करणे , मोकळ्या पॅसेजला ग्रील लावणे असे प्रकार सर्रास बघायला मिळतात आणि कायद्या...