स्वकष्टार्जित मिळकतीचे काय करायचे हे ठरविण्याचा आई-वडिलांना पूर्ण अधिकार.. ऍड. रोहित एरंडे. ©
स्वकष्टार्जित मिळकतीचे काय करायचे हे ठरविण्याचा आई-वडिलांना पूर्ण अधिकार.. ॲड. रोहित एरंडे. © आमच्या बिल्डींगचे रिडेव्हलपमेंट करण्याचे ठरत आहे. आमचा फ्लॅट आमच्या आई-वडिलांनि घेतलेला आहे आणि करार देखील दोघांच्या नावावर आहे. आम्ही एकुण ३ भावंडे आहोत आणि आईवडिलांबरोबर आमचा धाकटा भाऊ राहत आहे. आमच्या प्रत्येकाचे स्वतंत्र फ्लॅटही आहेत. पण आता जो नवीन फ्लॅट होईल तो त्याला त्याच्या एकट्याच्या नावावर करून हवा आहे आणि आमचा काहीही हक्क नाही असे त्याने सोसायटीला कळविले आहे. आई-वडील त्याच्याकडे राहत असल्याने ते यावर काहीही बोलायला तयार नाहीत, पण त्यांचा त्रास आम्हाला कळतो. . . आम्हाला कोर्टात जायची इच्छा नाही. तरी यावर काय मार्ग काढावा ? एक वाचक, पुणे. प्रॉपर्टी असली तरी त्रास, नसली तरी त्रास असे म्हणतात. मात्र जेव्हा असे वाद आपल्या रक्ताच्या नात्यातील लोकांशी होतात तेव्हा संताप आणि मानसिक क्लेश या दोन्ही भावना एकाच वेळी दाटून येतात याचा अनुभव अनेकांनी घेतला असेल. आपल्या प्रकरणामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे फ्लॅ...