Posts

Showing posts from November 5, 2024

पतीच्या मृत्यूनंतर त्याची मिळकत कशी विभागली जाईल ? ऍड. रोहित एरंडे.©

 पतीच्या मृत्यूनंतर त्याची मिळकत कशी विभागली जाईल ? ऍड. रोहित एरंडे.© आमच्या   बिल्डिंगचे आता पुनर्विकासाचे ठरत आहे.  त्यामध्ये माझ्या आणि माझ्या पतीच्या  नावे एक फ्लॅट आहे. माझ्या पतीचे मागच्या वर्षी आकस्मिक निधन झाले. त्यांनी कोणतेही मृत्यूपत्र केले नव्हते.  मूळ ऍग्रिमेंट मध्ये पहिले नाव माझ्या पतीचे आणि दुसरे माझे आहे. त्यामुळे आता त्यांचा हिस्सा बायको म्हणून मला एकट्यालाच मिळेल,  का आमच्या दोन्ही मुलांना त्यात काही हिस्सा मिळेल आणि हेच नवीन फ्लॅटला हि लागू होईल का  ? एक वाचक, पुणे  आपल्यासारखे प्रश्न बऱ्याच जणांना पडतात. अनेक लोकांना असे वाटत असते कि वैवाहिक साथीदाराच्या मृत्यूनंतर उर्वरित जोडीदाराच आपोआप एकटा १००% मालक बनतो. तसेच अनेक गैरसमज असा आहे कि पहिले नाव ज्याचे असते त्याचा हिस्सा किंवा अधिकार हा दुसरे नाव असलेल्यापेक्षा जास्त असतो आणि पहिले नाव असलेली व्यक्ती मयत झाली कि आपोआप सर्व हक्क दुसरे नाव असलेल्या व्यक्तीलाच मिळतो.  एखाद्या मिळकतीमध्ये मालकी हक्क हा व्यक्तींच्या हयातीमध्ये  खरेदीखत, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र, वाटप-पत्र यांसारख्या नोंदणीकृत दस्तानेच तबदील केला जाऊ शक