Posts

Showing posts from October 8, 2024

मुलांचे खेळ आणि नियमावली : ऍड. रोहित एरंडे ©,

 मुलांचे खेळ आणि नियमावली ..  सर आमच्या सोसायटीत एक  common garden व children play area आहे. तिथे लहान मुलांसाठी घसरगुंडी व झोपाळा आहे. काही झाडे पण तेथे लावली आहेत. सोसायटीत क्रिकेट व फुटबाॅल खेळण्यास बंदी आहे. तरी काही 7 वी 8 वीतील मुले त्याच्या बाजुला असलेल्या drive away किंवा इमारत व  garden च्या मधे फुटबाॅल खेळतात. मध्यंतरी  त्यावरुन वादावादी झाली कारण एका लहान मुलाला बाॅल लागला असता. त्यावर काही सभासदांचे म्हणणे आहे की मधल्या गार्डनच्या जागी झाडे कापुन नेट लावुन तो Area cover करुन मुलांना खेळायला जागा करायची. असे कायद्याने सोसायटी करु शकते का? कारण काही सभासदांचा ह्याला विरोध आहे.  एक वाचक, पुणे :  आपल्या प्रश्नाच्या निमित्ताने  आदर्श उपविधी १६८ याचा उल्लेख करणे गरजेचे आहे आणि तो सर्वांच्या माहितीकरिता खाली उद्धृत केला आहे. या नियमावर कधी लिहायला लागेल असे वाटले नव्हते. असो.  १६८ - संस्थेच्या आवारात खेळ खेळण्यावर निर्बंध : संस्थेची इमारत  / इमारती यांचे स्थान  लक्षात घेऊन तसेच इमारतीचा परिसर आणि संस्थेच्या सदस्यांना आणि त्यांच्या मुलाबाळांना खेळण्यासाठी उपलब्ध असलेली मोकळी जागा ल