डिव्होर्स नंतर संयुक्त मालकीच्या फ्लॅटची मालकी कोणाकडे ? - ॲड. रोहित एरंडे ©
डिव्होर्स नंतर संयुक्त मालकीच्या फ्लॅटची मालकी कोणाकडे ? आमच्या मुलाच्या आणि सुनबाईंच्या नावावर एक फ्लॅट आहे, मुलाचे नाव पहिले आणि दुसरे सुनबाईंचे. सर्व सुरळीत चालू आहे असे आम्हाला वाटत असतानाच अचानक त्या दोघांनी परस्पर संमतीने डिव्होर्स घेणार असल्याचे जाहीर केल्यामुळे आम्हा उभयतांवर जणू डोंगरच कोसळला आहे. त्यातून आम्ही मार्ग काढायचा प्रयत्न करत आहोतच. पण जर डिव्होर्स झाला तर या फ्लॅटची मालकी त्याचे नाव पहिले असल्याने मुलाकडे जाईल का ? दोघेही चांगले शिकलेले आणि चांगल्या नोकरीत आहेत. कदाचित आमची बिल्डिंग रिडेव्हल्पमेंटला देखील जाईल, त्यामुळे काय करावे लागेल ? एक त्रस्त पालक., पुणे. सध्या समाजाचे आणि त्यातही सुशिक्षित कटुंबांचे डिव्होर्स - घटस्फोट हे व्यवच्छेदक लक्षण म्हणावे लागेल एवढे हे प्रमाण वाढते आणि चिंताजनक आहे. काल परवा पर्यंत दूरवर कोणाच्या तरी बाबतीत घडणारा डिव्होर्स हा त्याचे "टॅबू -पण" सोडून आपल्या दारापर्यंत कधी येऊन ठेपला हे बदलत्या सामाजिक परिस्थितीमुळे कळलेच नाही. डिव्होर्सची करणे हि व्यक्ती प्रमाणे बदलत असतात आणि...