आई-वडिलांना त्यांच्या स्वकष्टार्जित मिळकतीचे काय करायचे हे ठरविण्याचा पूर्ण अधिकार.. ॲड. रोहित एरंडे. ©
आई-वडिलांना त्यांच्या स्वकष्टार्जित मिळकतीचे काय करायचे हे ठरविण्याचा पूर्ण अधिकार.. ॲड. रोहित एरंडे. © "सर, मी आई- वडिलांबरोबर राहतो, त्यांची देखभाल करतो, धाकटा भाऊ दुसरीकडे राहतो त्यामुळे आमच्या सोसायटीचा पुनर्विकास झाल्यावर जो नवीन फ्लॅट मिळेल तो आई-वडिलांनी मलाच द्यायला हवा.. " या सारखे संवाद सध्या बऱ्याचदा वकीलांच्या ऑफिसमध्ये घडत असतात. कोर्ट हे असे ठिकाण आहे जिथे लोकांचे मुखवटे दूर होऊन खरे चेहरे समोर येतात आणि प्रॉपर्टी असली तरी त्रास, नसली तरी त्रास, अश्या परस्पर विरोधी घटना कोर्टात बघायला मिळतात. "वंध्यत्वं तु समीचीनं कुपुत्रो दुखःदायकः " म्हणजे "एकवेळ संतती नसली तरी चालेल, पण कुपुत्र (कुपुत्री ) अत्यंत दुःख देणारा ठरतो" अश्या आशयाचे वचन श्रीभागवत महापुराणामध्ये आढळून येते. त्यामुळे असे वाद जर 'आई-वडील विरुद्ध मुले' किंवा सख्ख्या भावंडामध्ये असतील आणि प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळावा म्हणून मुले जर आई-वडिलांचा छळ करत असतील तर त्याला वेगळे स्वरूप प्राप्त होते. आई-वडील आणि मुले एकत्र राहतातआणि जो पर्...