मृत्युपत्राचा लाभार्थीच आधी मयत झाला तर ? - ऍड. रोहित एरंडे. ©
मृत्युपत्राचा लाभार्थीच आधी मयत झाला तर ? माझ्या वडिलांनी स्वतःच मृत्युपत्र लिहून ते नोंदवून ठेवले होते. मृत्युपत्रामध्ये त्यांच्या मिळकतीचे आम्हा तीन भावंडांमध्ये विभाजन कसे करावे हे लिहून ठेवले होते. मात्र माझ्या एका बहिणीचा मृत्यू माझे वडिलांच्या हयातीतच झाला आणि त्यानंतर सुमारे १ वर्षाने आमच्या वडिलांचे निधन झाले. आता जी बहीण वडिलांच्या हयातीमध्येच मयत झाली आहे, तिचे यजमान आणि मुले (दोन मुली आणि एक मुलगा) तिला दिलेल्या मिळकतीमध्ये हक्क सांगत आहेत. तर असा त्यांना हक्क आहे का ? का आम्हा उरलेल्या २ भावांचाच फक्त हक्क आहे ? एक वाचक, पुणे. मृत्युपत्र हा खूप महत्वाचा दस्तऐवज आहे जेणेकरून आपल्या मृत्युनंतर आपल्या मिळकतीचे विभाजन विना-वाद व्हावे आणि यासाठी मृत्यूपत्र हे तज्ञ वकीलांकडून करून घेणे का गरजेचे आहे हे आपल्याला समजून येईल. आता तुमच्या प्रश्नाकडे वळू या. मृत्युपत्रासंबंधीच्या तरतुदी किती सविस्तरपणे केल्या आहे हे भारतीय वारसा कायदा १९२५ पाहिल्यावर लक्षात येईल. आपल्या प्रश्नाचे उत्तर कलम ...