आय-फोन चोरीला गेला म्हणून इन्शुरन्स क्लेम मिळाला पण चोरीचा फोन शोधण्याची जबाबदारी ॲपल कंपनीवर नाही. ॲड. रोहित एरंडे. ©
आय-फोन चोरीला गेला म्हणून इन्शुरन्स क्लेम मिळाला पण चोरीचा फोन शोधण्याची जबाबदारी ॲपल कंपनीवर नाही. ॲड. रोहित एरंडे. © सुप्रीम कोर्टापर्यंत हल्ली कोणते प्रकरण पोहोचेल हे सांगता येत नाही. अशीच हि एक केस म्हणता येईल. तक्रारदार - हरिशचंद्र मोहंती नामक व्यक्ती २०१८ मध्ये रु. ५४,७००/- किंमतीचा आय-फोन विकत घेतो आणि त्याच बरोबर कंपनीच्या सांगण्यावरून फोन चोरीला गेल्यास, हरविल्यास नुकसान भरपाई मिळण्यासाठी "एमए ॲपल टोटल (प्रोटेक्शन प्लॅन ) नावाची वार्षिक रु. ५१९९/- हप्ता असलेली इन्शुरन्स पॉलिसी देखील तो विकत घेतो, मात्र कोणत्या कंपनीची इन्शुरन्स पॉलिसी आहे हे मात्र गुलदस्त्यात असते. पुढे बोला-फुलाची गाठ म्हणतात तसे या पॉलिसीचा वापर करण्याची वेळ तक्रारदारावर काही महिन्यांतच येते कारण बदामबाडी, कटक येथील बसस्टँड वरून त्याचा फोन चोरीला जातो ! त्याविरुद्ध रितसर एफआयआर दाखल होते आणि हि माहिती आणि फोन विकत घेतल्याचे बिल याची माहिती तक्रारदार ॲपल कंपनीलाहि लगेच कळवतो. मात्र बरेच दिवस यावर ॲपल कंपनीकडून काहीच उत्तर न आल्याने...