पाणीगळती आणि सोसायटीची जबाबदारी. ऍड. रोहित एरंडे ©
पाणीगळती आणि सोसायटीची जबाबदारी. ऍड. रोहित एरंडे © आमच्या सोसायटीमध्ये या पावसाळ्यात बऱ्यापैकी पाणी गळती झाली आहे. टॉप टेरेस मधून आणि बाजूच्या भिंतींमधूनसुद्धा गळती होऊन काही सभासदांच्या फ्लॅट मध्ये पाणी गळत आहे. सोसायटीला आम्ही सांगितले तर ते काहीही करत नाहीत, तुमचे तुम्ही बघा असे सांगतात. तर याबाबतीत सोसायटीची कायदेशीर जबाबदारी काय आहे ? त्रस्त सभासद, पुणे.. सोसायटी आणि पाणी गळती हा प्रश्न पावसाळ्यात अधिक "ज्वलंत" होतो.. याबद्दलची कायदेशीर माहिती थोडक्यात बघू या. सोसायटीची जबाबदारी : सोसायटीच्या दुरुस्त उपनियम १५९ मध्ये सोसायटीने दुरुस्तीचे आणि देखभालीची कुठले कुठले खर्च करणे गरजेचे आहे, त्याची यादी दिलेली आहे. ह्या मध्ये सर्व प्रकारच्या पाण्याच्या गळत्या ज्यामध्ये पावसाच्या होणाऱ्या गळत्या आणि बाहेरील सामाईक पाईप तसेच मलनिःस्सारण वाहिनीमधून होणाऱ्या गळत्या ह्यांचा देखील समावेश होतो. तसेच पावसामुळे गच्चीमधून होणाऱ्या गळतीमुळे टॉप फ्लॉवर फ्लॅटचे छत तसेच त्यावरील प्लास्टर खराब होणे, ह्या खर्चाचा समावे...