भाषा सक्ती करता येईल ? : ॲड. रोहित एरंडे ©
भाषा सक्ती करता येईल ? ॲड. रोहित एरंडे © "एखादी भाषा ही विशिष्ट धर्माची जहागीर नाही, भाषा हे संपर्काचे माध्यम आहे. त्यामुळे हिंदी ही हिंदूंसाठी आणि उर्दू हि फक्त मुस्लिमांसाठी हे मानणे चूकच आहे, " असे नमूद करून सर्वोच्च न्यायालयाने मागील आठवड्यात अकोला नगरपालिकेने उर्दू भाषेमध्ये लावलेले फलक काढावे अशी मागणी केलेली याचिका फेटाळताना वरील निकाल दिला.आता वाळू या हिंदी सक्तीच्या निर्णयाकडे कडे सर्व शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा विषय सक्तीचा करण्यासाठी कायदा करणार असल्याचे सरकारने जाहीर केले आणि परत एकदा विवादास्पद विषय सुरू झाला आहे. आपल्याला आठवत असेल तर ४-५ वर्षांपूर्वी मराठी मातृभाषा म्हणून मराठीची सक्ती करणाऱ्या निर्णयाला देखील असाच विरोध झाला होता. अर्थात या विरोधाला आता राजकारणाची जोड मिळाल्यामुळे याच्या विरोधात अनेक पक्ष सरसावले आहेत. तर मराठी, इंग्रजी या बरोबरच हिंदी हि तिसरी भाषा केल्याने देशभरात बदलत चाललेय मूल्यमापन पद्धतीमध्ये आपली मुले पुढील काळात मागे पडणार नाहीत असे तज्ज्ञ...