नॉमिनी सभासदाला (Provisional Member) मतदानाचा हक्क : ॲड. रोहित एरंडे ©
नॉमिनी सभासदाला (Provisional Member) मतदानाचा हक्क : ॲड. रोहित एरंडे © प्रश्न : आमच्या फ्लॅटसाठी माझ्या वडिलांनी मला नॉमिनी नेमले होते. वडिलांच्या मृत्युनंतर मी सोसायटीमध्ये सभासदत्व मिळविण्यासाठी अर्ज दिला, पण सोसायटीने माझे नाव शेअर सर्टिफिकेटवर प्रोव्हिजनल सभासद म्हणून लावले आणि मला मतदानाचा हक्क नाही असे म्हणून सोसायटीने मला सभांमध्ये भाग घेण्यापासून रोखले आहे. तरी याबाबत कृपया मार्गदर्शन करावे. एक वाचक, अंधेरी, मुंबई उत्तर : नॉमिनी म्हटले कि गैरसमज आणि वाद हे आलेच असे आता म्हणावे लागेल. सोसायटीमध्ये मूळ सभासद मयत झाल्यानंतर त्याच्या वारसांमध्ये आणि नॉमिनी मध्ये बऱ्याचदा वाद निर्माण होतात आणि अश्यावेळी सोसायटी कमिटीपुढे ह्या वादाचे निरसन कसे करायचे असा प्रश्न निर्माण होतो. परंतु सहकार कायद्यात दिनांक ९ मार्च २०१९ पासून झालेल्या बदलाप्रमाणे कलम १५४(बी) हे नवीन कलम दाखल झाले आहे. ज्यायोगे सभासदांच्या व्याख्येमध्ये पहिल्यांदाच नॉमिनी म्हणून नेमलेल्या व्यक्तीला "प्रोव्हिजनल मेंबर " म्हणजेच थोडक्यात कारणापुरता /तात्प...