Posts

Showing posts from November 2, 2024

जिवंतपणीच दोन पुनर्जन्म... काळ आला होता, पण वेळ नाही. . दरवर्षी ३ नोव्हेंबरला हे दोन दुर्धर प्रसंग आठवतातच ऍड. रोहित एरंडे.

 जिवंतपणीच दोन पुनर्जन्म... काळ आला होता, पण वेळ नाही. . दरवर्षी ३ नोव्हेंबरला हे दोन दुर्धर प्रसंग आठवतातच  ऍड. रोहित एरंडे. © मरणानंतर पुनर्जन्म असतो की नाही हा वादाचा विषय असू शकतो.. परंतु जिवंतपणी पुनर्जन्म मिळू शकतो ? उत्तर आहे होय आणि योगायोगाने दोन्ही घटनांची तारीख होती ३ नोव्हेंबर. पहिली घटना आहे माझे सासरे आणि पुण्यातील प्रख्यात वकील श्री. पी.पी. परळीकर ह्यांच्या बाबतीतील. सुमारे २००६ साली त्यांना लिंफनोड (N H L) च्या कॅन्सरचे निदान झाले. त्याचे केमो - रेडिएशन असे उपचार सुरू झाले. ह्या उपचाराचे काही साईड एफिकेट्स असतातच. त्याचाच परिपाक म्हणजे सासऱ्यांना एक दिवस अचानक cardiac arrest आला आणि ते घरीच कोसळले. घरच्यांनी आणि शेजारच्या सहस्रबुद्धे काकांनी ( सकस वाले) पटकन त्यांना दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये हलविले, परंतु हे १० मिनिटांचे अंतर देखील त्यावेळी काही तासांचे वाटत होते. तिकडे लगेचच उपचार सुरू झाले, परंतु त्यांचे हृदय जवळ जवळ बंद पडले होते, नाडी लागत नव्हती. डॉक्टरांनी २ शॉक देवून सुध्दा हृदय सुरू झाले नाही आणि स्क्रीन वरती फ्लॅट लाईन आली. त्यावेळचे तेथील आय सी यू इन्चार्