पतीच्या मृत्यूनंतर मिळकतीचे वारस कोण ? ॲड. रोहित एरंडे.©
पतीच्या मृत्यूनंतर मिळकतीचे वारस कोण ? ॲड. रोहित एरंडे.© माझ्या आणि माझ्या पतीच्या नावे एक फ्लॅट आहे. माझ्या पतीचे मागच्या वर्षी आकस्मिक निधन झाले. त्यांनी कोणतेही मृत्यूपत्र केले नव्हते. मूळ ऍग्रिमेंट मध्ये पहिले नाव माझ्या पतीचे आणि दुसरे माझे आहे. आम्हाला मूल बाळ नाही. मला सासू सासरे आहेत, पण त्यांच्याशी संबंध चांगले नाहीत, त्या सारख्या मला पाण्यात पाहतात आणि आता सासूबाई सारखा हिस्सा मागत आहेत ? तर नवऱ्याचा हिस्सा मला एकट्यालाच मिळेल, का सासू-सासऱ्यांना पण ? श्रीमती XXX ,मुंबई. आपल्यासारखे प्रश्न बऱ्याच जणांना पडतात. अनेक लोकांना असे वाटत असते कि वैवाहिक साथीदाराच्या मृत्यूनंतर उर्वरित जोडीदाराच आपोआप एकटा १००% मालक बनतो. तसेच अनेक गैरसमज असा आहे कि पहिले नाव ज्याचे असते त्याचा हिस्सा किंवा अधिकार हा दुसरे नाव असलेल्यापेक्षा जास्त असतो आणि पहिले नाव असलेली व्यक्ती मयत झाली कि आपोआप सर्व हक्क दुसरे नाव असलेल्या व्यक्तीलाच मिळतो. एखाद्या मिळकतीमध्ये मालकी हक्क हा व्यक्तींच्या हयातीमध्ये खरेदीखत, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र,...