Posts

Showing posts from March 15, 2025

Et tu, Brute? - "also you, Brutus?", ब्रुटस यू टू ? ॲड. रोहित एरंडे ©

  Et tu, Brute?  - "also you, Brutus?", ब्रुटस यू टू ? ॲड. रोहित एरंडे © जवळच्याच व्यक्तींनी विश्वासघात करण्याची  परंपरा पुरातन असल्याचे दिसून येईल. आपल्यापैकी अनेकांनी त्याचा अनुभव घेतला असेल आणि जवळच्या व्यक्तीने विश्वासघात केल्यावर ते व्रण कायम राहतात आणि त्याही पेक्षा   दुःख जास्त होते आणि मग राग येतो..  तर अशा विश्वासघातकी व्यक्तींसाठी "Et tu, Brute?  - "also you, Brutus?", ब्रुटस यू टू ?" — ही उपमा नेहमी दिली जाते. ज्यांना या उद्गारमागची पार्श्वभूमी कदाचित माहिती नाही, त्यांच्यासाठी हा प्रसंग थोडक्यात सांगतो.. शेक्सपिअरच्या ज्युलियस सीझर  या नाटकामुळे अजरामर झालेला हा उद्गार...आणि तो दिवस होता ख्रिस्तपूर्व ४४व्या वर्षातील  १५ मार्च. (15th March (latin - The Ides of March )44 BC )   ज्युलियस सीझर हा वरील ख्रिस्तपूर्व काळातील रोम साम्राज्यामधील एक मातब्बर सेनापती होता. १५ मार्च हा दिवस उजाडला..  प्रथेप्रमाणे अनेक बैलांचा बळी देऊन तो सिनेट मध्ये आला. त्याचे इतर सिनेट सहकारी आधीच उपस्थित होते. सीझरने एका अर्जावर काहीतरी ...