मासिक पाळीस आजार संबोधून इन्शुरन्स क्लेम नाकारणाऱ्या कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका . ॲड. रोहित एरंडे ©
मासिक पाळीस आजार संबोधून इन्शुरन्स क्लेम नाकारणाऱ्या कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका ... ॲड. रोहित एरंडे © पैसे असतील तर आजारी पडा , असे गंमतीने म्हंटले जाते याचे कारण सध्याच्या काळात हॉस्पिटलमधील उपचार हे सामान्यांच्या आवाक्यात असतीलच असे नाही (यामध्ये महत्वाची बाब म्हणजे हॉस्पिटल बिलामध्ये डॉक्टरांची फी ही तुलनेने कमी असतात) असो. वेळ काही सांगून येत नाही म्हणून वैद्यकीय विमा घेणे चांगले असते. परंतु भारतात फक्त ३८% लोकांकडे वैद्यकीय विमा - हेअल्थ इन्शुरन्स असल्याचे मागीलवर्षातील आकडेवारी सांगते. असा वैद्कयीय विमा घेताना ग्राहकाला काही पूर्व-आजारांची, चालू असलेल्या ट्रीटमेंटची माहिती प्रपोजल फॉर्म मध्ये भरणे गरजेचे असते. मात्र बऱ्याचदा असे फॉर्म स्वतः किंवा विमा एजंटकडून भरून घेताना कॅज्युअली / पूर्ण तपशिलासह भरली गेली नाही तर त्याची परिणीती क्लेम रद्द होण्यात होऊ शकते. एकतर हॉस्पिटलमुळे आधीच पेशंट आणि नातेवाईक यांची मानसिक स्थिती नीट असते, त्यातच विमा नाकारला गेला तर पैश्याचे सोंग कुठून आणायचे ? या संदर्भात विमा कंपनी आणि ग्...