अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि तारतम्य "जनी वावगे बोलता सुख नाही" अभिव्यक्ती स्वातंत्र्य - "तुमचे आमचे सेम असते" ऍड. रोहित एरंडे ©
अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि तारतम्य "जनी वावगे बोलता सुख नाही" अभिव्यक्ती स्वातंत्र्य - "तुमचे आमचे सेम असते" ऍड. रोहित एरंडे © अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे मंगेश पाडगावकर म्हणतात तसे "तुमचे आमचे सेम असते". आपल्याला पाहिजे तेव्हा स्वातंत्र्य आणि त्याचवेळी ते दुसऱ्याला नाही, असे "सोयीचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य" होऊ शकत नाही. आपण केलेली ती निकोप टीका आणि दुसऱ्याने केलेली असभ्य टीका हे ठरविण्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी "आपणास चिमोटा घेतला ।तेणें कासाविस जाला । आपणावरून दुस-याला ।राखत जावे ।। कठिण शब्दें वाईट वाटतें । हें तों प्रत्ययास येतें । तरी मग वाईट बोलावें तें । कायें निमित्य ।।" हे दासबोधातील वचनच उत्तर ठरावे. युट्यूबर रणवीर अलाहाबादियानं केलेलं एक वक्तव्य वादाचं केंद्र बनलं आहे आणि त्याच्यावर भारतात विविध ठिकाणी एफआयआर दाखल झाले आहेत आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली आहे आणि "या अत्यंत महत्वाच्या" पिटिशनवर लगेचच सुनावणी देखील होऊ शकते. त्याच्या शो दरम्यान त्यानं एका स्पर्धकाला त्याच्या पालकांच्या वैयक्तिक नात्...