Posts

Showing posts from April 16, 2025

ऑनलाईन फ्रॉड : आरबीआय आणि न्यायालयांचा ग्राहकांना दिलासा : ॲड. रोहित एरंडे ©

ऑनलाईन फ्रॉडच्या  फसवणुकीवर आरबीआय आणि  न्यायालयांचा   ग्राहकांना दिलासा      ॲड. रोहित एरंडे © सध्याच्या ऑनलाईन  जमा‍न्यात सायबर फ्रॉड    मोठ्या प्रमाणात वाढले आहे . त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करून ऑनलाईन आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांची संख्या जास्तच आहे. रस्त्यावर वस्तू विक्री करणाऱ्यांपासून ते बँकांचे व्यवहार ऑनलाईन माध्यमातून होत आहेत.    सोयी तितक्या  गैरसोयी असे आपल्याकडे म्हणतात त्याप्रमाणे "वन क्लिक अवे " च्या  जमान्यात अशी  घटना  घडल्यावर, ,   कोणताही  खातेदार अगदी हतबल होऊन जातो कारण काही कळायच्या आत पैसे गेलेले असतात.  बऱ्याचदा बँक  खातेदार  अनावधानाने अश्या फ्रॉडचे बळी पडतात. ज्यांचे पैसे जातात त्यांना आपण फसले गेलो याचे अतीव दुःख असतेच आणि त्याचा राग येतो. मात्र या दुःखावर आरबीआय आणि उच्च न्यायालयांनी तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाने ग्राहकांच्या दुःखावर फुंकर घालण्याचे काम केले आहे आणि याची माहिती बहुतेक जणांना नसल्याची दिसून येते. या लेखाच्या निमित्ताने या व...