Posts

Showing posts from March 7, 2025

"तो हक्क" सर्वस्वी महिलांचाच : ॲड. रोहित एरंडे ©

"विवाहित असो वा लिव्ह-इन मध्ये राहणाऱ्या , मूल होऊ द्यायचे की नाही हा निर्णय  सर्वस्वी महिलांचाच." "प्रसूती -नॉर्मल का सिझेरिअन हाही हक्क महिलांचाच.. "अविवाहित महिलांनाही गर्भपाताचा अधिकार" ऍड. रोहित एरंडे. ©    "सकाळ मनी" च्या माध्यमातून  आर्थिक साक्षरतेचे महत्त्व वेळोवेळी आपल्याला समजत असते.  कोव्हीड नंतर उद्भवलेल्या परिस्थितीमधून धडा घेऊन "सकाळ मनी" च्या माध्यमातून "महिलांनो  आर्थिक साक्षर बना " या लेखातून  मी डिसेंबर २०२३ च्या अंकामध्ये महिलांनी स्वतःचे आथिर्क निर्णय घेण्याचे शिकणे  का महत्वाचे आहे ते नमूद केले होते.  असो. पण म्हणतात ना विरोधाभास हे आपल्या संस्कृतीचे व्यवच्छेदक लक्षण आहे. कारण  एकीकडे महिला दिनाचे कौतुक करायचे, किंवा नवरात्रामध्ये देवीचे रूप म्हणून 'उदो उदो' करायचे आणि दुसरीकडे महिलांनी   मूल  जन्माला घालायचे का  नाही आणि ठरवले  तर प्रसूती कुठल्या पध्दतीने व्हावी, यावर आपला काहीही संबंध नसताना  पु.ल. म्हणायचे तसे "मत ' ठोकून द्यायचे  असे प्रकार दिसून येतात आणि यामध्ये महिलावर्ग...