गाडी विकणाऱ्यांना सर्वोच्च दिलासा ! ऍड. रोहित एरंडे ©
गाडी विकणाऱ्यांना सर्वोच्च दिलासा ! ऍड. रोहित एरंडे © नवीन गाडी घेताना बऱ्याचदा जुनी गाडी एक्सचेंज केली जाते आणि गाडीचे पैसे दिले-घेतले जातात. आर. टी.ओ फॉर्म्स वरती सह्या देखील कार-एक्सचेंज करणाऱ्यांकडून घेतल्या जातात, पण एकतर ती गाडी पुढे कधी विकली जाईल हे माहिती नसते आणि विकली गेल्यावर देखील आर.टी.ओ रेकॉर्डमध्ये वाहन मालक म्हणून नवीन मालकाचे नाव बदलले गेले आहे का हे तपासण्याचे देखील बहुतांशी लोकांच्या गावी नसते. कारण गाडीचा अपघात झाला तर आर. टी.ओ रेकॉर्ड सदरी ज्याचे नाव मालक म्हणून नोंदविले गेले आहे त्याच्यावर ते उत्तरदायित्व येते. मोटर वाहन कायद्याच्या कलम २(३०) प्रमाणे ज्या व्यक्तीच्या नावाने रजिस्ट्रेशन झालेले असते, तीच व्यक्ती गाडीची मालक समजली जाते. याला अपवाद म्हणजे ती व्यक्ती अज्ञान असेल तर किंवा हायर-पर्चेस कराराने गाडी घेतली असेल तर अनुक्रमे त्या व्यक्तीचा पालक आणि ज्याच्या ताब्यात गाडी असेल ती व्यक्ती मालक समजली जाते. नुकसान भरपाई मागणाऱ्या व्यक्तीला नुकसान भरपाई मिळणे सोपे जावे आणि रजिस्टरला नोंद न झालेल्या वेगवेगळ्या तथाकथीत गाड...