सोसायटीच्या नावे कन्व्हेयन्स झालानसल्यास पुनर्विकासाचा मार्ग खडतर. : ॲड. रोहित एरंडे ©
सोसायटीच्या नावे कन्व्हेयन्स झाला नसल्यास पुनर्विकासाचा मार्ग खडतर. प्रश्न : आमची ३०-४० वर्षे जुनी सोसायटी आहे आणो आता बिल्डिंगची अवस्था बघता आणि सोयी-सुविधांचा अभाव असल्याने पुनर्विकास करण्याचे ठरत आहे. परंतु अद्याप सोसायटीच्या नावे कन्व्हेयन्स झालेला नाही. तरी आम्हाला पुनर्विकास करता येईल किंवा कसे ? सोसायटी सभासद, पुणे. उत्तर : सर्व प्रथम कन्व्हेयन्सचा अर्थ थोडक्यात समजावून घेऊ. कन्व्हेयन्सचा अर्थ एखाद्या जागेमधील मालकी हक्क दुसऱ्याच्या नावे तबदील करणे, थोडक्यात खरेदी खत असे म्हणता येईल. भारतामध्ये 'ड्युअल ओनरशिप' हि पद्धत असल्यामुळे जमिनीचा मालकी हक्क एकाकडे आणि त्यावरील इमारतीची मालकी दुसऱ्याकडे असू असते, आपल्याकडे सहसा अशी पद्धत असते, कि जमीन मालक हा बिल्डर बरोबर डेव्हलपमेंट ऍग्रिमेंट करतो ज्यायोगे बिल्डर बिल्डिंग बांधतो. त्याच दरम्यान कायद्याप्रमाणे युनिट / फ्लॅट विकत घेणाऱ्यांबरोबर बिल्डरला लेखी करारनामा करणे क्रमप्राप्त असते आणि नंतर सोसायटी किंवा अपार्टमेन्ट स्थापन करण्याची जबाबदारी बिल्डरवरती असते. सोसायटी आणि ...